पंढरपूर तालुका

पंढरपूर हे शहर पंढरपूर तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण असून हे भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपूरची लोकसंख्या ५३,६३८ (१९७१) इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे. काही मध्ययुगीन कानडी शिलालेखांत पंढरपूर या क्षेत्राचे नाव नाव 'पंडरगे' असे आहे.[१] मूळ नाव पुंडरीकपूर असे असावे किंवा पांढरी (गावाची वेस) या शब्दाशीही प्रस्तुत क्षेत्राच्या नावाचा संबंध असण्याची शक्यता आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचेकुलदैवत म्हणतात.[२] हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे. पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मूर्ती आहेत.

Thursday, 25 July 2024

ग्राम विकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण अमृत महा आवास अभियान


 

ग्राम विकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण

अमृत महा आवास अभियान

(सन-२०२२-२३)

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जिल्हास्तरीय प्रशस्तीपन्न पंचायत समिती, पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांना अमृत महा आवास अभियान २०२२-२३ अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून 'सर्वोत्कृष्ट तालुका ' या प्रकारात प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येत आहे

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, सोलापूर अंतर्गत

सन २०२२-२३ या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येत आहे


छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राष्ट्रीय शुटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा


 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राष्ट्रीय शुटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा

दि. २७/२८ फेब्रुवारी २०२३

* आयोजक *

पंढरपूर व्हॉलीबॉल संघ

* ठिकाण: टिळक स्मारक मैदान, पंढरपूर, जि. सोलापूर (महाराष्ट्र)

सन्मानचिन्ह

अमृत महा आवास अभियान


ग्राम विकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण

अमृत महा आवास अभियान

(सन-२०२२-२३)

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जिल्हास्तरीय प्रशस्तीपन्न पंचायत समिती, पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांना अमृत महा आवास अभियान २०२२-२३ अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून 'सर्वोत्कृष्ट तालुका ' या प्रकारात प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येत आहे


 

Wednesday, 24 July 2024

"Nirmal Wari" was conducted today in the presence of Hon'ble Chief Minister Shri Eknath Shinde Saheb in Pandharpur Panchayat Samiti. We received acknowledgement today for all of us as a team.



 

*Ram Krishna Hari🙏... All colours become one. Saint Tukaram Maharaj and Saint Dnyaneshwar Maharaj welcoming the palanquin ceremony at Pandharpur.


 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

 पंचायत समिती पंढरपूर येथे आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती माननीय श्री संसारे साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर यांच्या हस्ते साजरी करण्यात आली


चंद्रभागा

 भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा (भिवरा) इंद्रायणी- भामा- नीरा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते. रेल्वे पूल ते विष्णूपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते. म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले. स्कंद पुराणातील माहात्मेय ‘चंद्रभागा’ नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ (जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आधीचे आहे.) होते, असे सांगते. तर, संत जनाबाई ‘भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा’ असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात. पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते. नद्यांचा अभ्यास करणाऱ्यांना हे नावाचे कोडे उलगडलेले नाही. इ.स. १८५० सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तेथे सापडला होता. म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असे दिसते. काळाच्या ओघात आता काही नाही. पंढरपुराच्या पंचक्रोशीतील जवळील नद्या म्हणजे दुर्गादेवीजवळची धारिणी, भुवनेश्वरीजवळची पुष्पावती (जी मूळची यमुना कृष्णाबरोबर पंढरपुरात आली), संध्यावळीजवळच्या शिशुमाला-भीमासंगम, उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा, सती, सुना, भृंगारी आणि पंचगंगा, यांचा भीमेशी संगम होतो. त्यामुळे संत मंडळी अभंगातून बऱ्याच वेळा भीमा भिवराकाठी देव असल्याचा उल्लेख करतात.

ग्राम विकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण अमृत महा आवास अभियान

  ग्राम विकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण अमृत महा आवास अभियान ( सन-२०२२-२३) प्रधानमंत्री आवास योजना ग...